मार्वल
राज्य पोलीस दलास “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” चा वापर करुन कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून “नाविन्यपूर्ण” नामक “विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही)” स्थापन करण्यास मान्यता देणेबाबत…. (पीडीएफ 518 केबी)
राज्य पोलीस दलास “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” चा वापर करुन कायदा अंमलबजावणीचे कार्य अधिक प्रभावीपणे करता यावे म्हणून “सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रगत संशोधन आणि दक्षता (मार्वल)” नामक “विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही)” स्थापन करण्यास शासन निर्णय, गृह विभाग, क्र.संकीर्ण-0823/प्र.क्र.130/पोल-3, दिनांक 16.02.2024, द्वारे, पुढील अटींवर, तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे:-
- उक्त “एसपीव्ही” स्थापन करण्याच्या प्रयोजनासाठी राज्य शासन, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर, आणि मे. पिनाका टेक्नोलॉजीज खाजगी मर्या. या तीन पक्षांमध्ये करार करण्यात यावा.
- उक्त “एसपीव्ही” हे 100 टक्के शासनाचे भाग भांडवल असलेली, शासन मालकीची, “सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रगत संशोधन आणि दक्षता (मार्वल)” या नावाने खाजगी मर्यादित कंपनी म्हणून नोंदणीकृत करण्यात येईल.
- पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण), हे उक्त कंपनीचे पदसिद्ध संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि ते थेट शासनाच्या (गृह विभागाच्या) अधिपत्याखाली काम करतील.
- संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर, हे उक्त कंपनीचे पदसिद्ध संचालक असतील आणि कंपनीचे इतर संचालक हे शासन नामनिर्देशित करेल.
- त्यास अनुलक्षून उक्त “एसपीव्ही” स्थापन करण्यास दिनांक : 16 मार्च 2024 रोजी शा. नि. द्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.