परिचय
-
प्रशासनिक सोयी आणि कार्यक्षमतेसाठी गृह विभागाचे “कायदा व सुव्यवस्था” आणि “परिवहन” असे दोन विभाग करण्यात आले होते. नंतर परिवहन विभागाचे विभाजन करून दोन नवीन भाग (१) परिवहन व तुरुंग, (२) राज्य उत्पादन शुल्क असे दिनांक १६ डिसेंबर १९८५ पासून करण्यात आले आहेत. (2)गुन्ह्यांचा प्रतिबंध व अन्वेषण, कायदा व सुव्यवस्थेचे पालन, पोलीस, होमगार्ड व नागरी संरक्षण यांचे प्रशासन व नियंत्रण आणि न्याय प्रशासन, तसेच गृह (मंत्रालय) विभागाची आस्थापना यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव सांभाळतात. (3)परिवहन विभागात परिवहनाच्या पद्धती, म्हणजे मार्ग परिवहन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (परिवहन) हे सांभाळतात. तुरुंग विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (अपील व सुरक्षा) हे सांभाळतात. राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/सचिव (राउशु) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच विदेशी नागरिक हा विषय दिनांक १ डिसेंबर १९९५ पासून गृह विभागाकडे सोपविण्यात आलेला आहे.
-
अपर मुख्य सचिव यांना त्यांच्या कामात उच्च पातळीवर मदत देण्यासाठी, तसेच त्यांच्याकडील काही कार्यभार विभागून घेण्यासाठी सप्टेंबर १९८० पासून अपर सचिव, गृह विभाग हे एक नवीन पद निर्माण करण्यात येऊन त्यावर ज्येष्ठ आय. पी. एस. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक १ जानेवारी १९८९ पासून हे पद सचिव (अपील व सुरक्षा) या पदनामात बदलण्यात आले. तद्नंतर दिनांक २६ सप्टेंबर १९९० पासून हे पद प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) या पदनामात बदलण्यात आले. तद्नंतर या पदाचे पदाभिधान विशेष कार्य अधिकारी असे करण्यात आले होते. दिनांक ३० एप्रिल १९९३ रोजी हे पदधारक सेवानिवृत्त झाल्यानंतर, या पदाचे पदनाम पुन्हा प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) असे करण्यात येऊन त्यापदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी नियुक्तीस आहेत.
-
राज्यातील व प्रामुख्याने मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न व न्यायालयीन चौकशी संबंधात तातडीचे कामकाज याबाबत अपर मुख्य सचिवांना साहाय्य करण्यासाठी दिनांक ६ फेब्रुवारी १९९३ पासून सचिव ( कायदा व सुव्यवस्था) गृह विभाग हे एक नवीन पद निर्माण करण्यात येऊन त्यावर ज्येष्ठ आय. पी. एस. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक ५ डिसेंबर १९९६ पासून हे पद प्रधान सचिव (विशेष) या पदनामात बदलण्यात आले आहे.
-
या विभागातील काम ५३ कार्यासनांत विभागण्यात आले आहे. कार्यासनाच्या प्रमुखपदी कक्ष अधिकारी/ अवर सचिव आहेत आणि ही कार्यासने 1४ सहसचिव/उपसचिव, 3- प्रधान सचिव आणि 2 – अपर मुख्य सचिव यांच्या पर्यवेक्षीय नियंत्रणाखाली आहेत. शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक एचडीई-०१०२/प्र. क्र.-१३६ / आस्था- २, दिनांक ३१ मे २००५ अन्वये विभागातील एकूण २२ पदे, तसेच शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक एचडीई-०१०२/प्र. क्र.-१३६ / आस्था- २, दिनांक ४ नोव्हेंबर २००६ अन्वये २८ पदे अशी एकूण ५० पदे निरसित केल्यानंतर, त्याचप्रमाणे शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक शा. का. नि १००६/प्र. क्र. २३/२४०६/१८ (र. व का.) दिनांक ३१ मे २००६ अन्वये पर्यटन व सांस्कृतिक कार्य असा नवीन विभाग करण्यात आल्याने शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक एचडीई-०१०६/ प्र. क्र. १३६/आस्था-२, दिनांक ६ नोव्हेंबर २००६ अन्वये पर्यटन उपविभागाची १६ अस्थायी पदे नवनिर्मित पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह हस्तांतरित केली आहेत. तसेच शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक गृहआ १०११/प्र. क्र.-६०४/ आस्था- २, दिनांक २३ ऑगस्ट २०११ अन्वये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यासाठी १-उपसचिव, १ कक्ष अधिकारी, १ सहायक, १ लिपिक-टंकलेखक अशी एकूण ४ पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यानंतर वित्त विभागाच्या दिनांक १४ जानेवारी २०१८ च्या आदेशानुसार दिनांक २० ऑक्टोबर २०१८ च्या आदेशान्वये शिपाई संवर्गातील १३ पदे (७ अस्थायी व ६ स्थायी पदे) निरसित करण्यात आली आहेत. दिनांक १६ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या आकृतिबंधानुसार आता या विभागाच्या राजपत्रित व अराजपत्रित पदांची एकूण संख्या ४२९ आहे.
अ.क्र. | पदनाम | पदाची वेतनसंरचना | मंजूर पदे |
---|---|---|---|
1 | अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव | संवर्ग पद | 4 |
2 | सह/उप सचिव | एस-27: 118500-214100/
एस-25: 78800-209200 |
14 |
3 | अवर सचिव | एस-23 : 67700-208700 | 11 |
4 | कक्ष अधिकारी | एस-17: 47600-151100
एस-20: 56100-177500 |
43 |
5 | सहायक कक्ष अधिकारी | एस-14: 38600-122800 | 121 |
6 | लिपिक-टंकलेखक | एस-6: 19900-63200 | 159 |
7 | वरिष्ठ स्वीय सहायक | एस-23: 67700-208700 | 04 |
8 | निवडश्रेणी लघुलेखक | एस-16: 44900-142400 | 03 |
9 | उच्चश्रेणी लघुलेखक | एस-15: 41800-132300 | 16 |
10 | निम्नश्रेणी लघुलेखक | एस-14: 38600-122800 | 06 |
11 | लघुटंकलेखक | एस-8: 25500-81100 | 04 |
12 | लेखाधिकारी | एस-16: 44900-142400 | 01 |
13 | वाहनचालक | एस-6: 19900-63200 | 09 |
14 | हवालदार | एस-3: 16600-52400 | 01 |
15 | नाईक | एस-3: 16600-52400 | 04 |
16 | झेरॉक्स मशीन चालक | एस-3: 16600-52400 | 03 |
17 | शिपाई | एस-1: 15000-47600 | 26 |
एकूण | 429 |