उद्दिष्टे आणि कार्ये
गृह विभाग, मंत्रालय (खुद्द) मधील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील
पोलीस विभाग
-
- शस्त्र अधिनियम, मुंबई पोलीस अधिनियम, सिनेमा अधिनियम व त्याखाली केलेले नियम व विनियमन या अन्यये केलेली अपिले हाताळणे.
- अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे व तिथे वितरण /नियत वाटप करणे.
- कायदा व सुव्यवस्था, अति-महत्वाच्या व्यक्तिची सुरक्षा, राज्याचे अंतर्गत व किनारी संरक्षण, अति-महत्वाची मोर्चे बांधणी (इन्स्टॉलेशन), धार्मिक स्थळे इत्यादी संबंधी बाबी हाताळणे.
- दहशतवादी / नक्षलवादी कृत्यांशी संबंधीत बाब हाताळणे.
- राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम, १९८० खालील प्रतिबंधात्मक स्थानबध्दतेबाबतची प्रकरणे हाताळणे.
- विदेशी चलन व चोरट्या व्यापारास प्रतिबंध अधिनियम, १९७४ बाबत प्रकरणे हाताळणे.
- महाराष्ट्र गैरकृत्यांचे उल्लंघन अधिनियम, १९८० बाबतची प्रकरणे हाताळणे.
- झोपडपट्टी दादा, हातभट्टी वाले, अंमली पदार्थाचे व्यापर करणारे व धोकादायक व्यक्ति यांची कृत्ये अधिनियम १९८१ (१९८१ चा एम. पी. डी. ए. अधिनियम) शी संबंधीत प्रकरणे हाताळणे.
- काळ्याबाजारास प्रतिबंध व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे विषयक अधिनियम, १९८० इत्यादीबाबतची प्रकरणे हाताळणे.
- मुंबई लॉटरी (नियंत्रण व कर), बक्षीस स्पर्धा अधिनियम १९५८ तसेच बक्षीस स्पर्धा नियम.
अधिनियम १९५५ धावतची प्रकरणे हाताळणे.
- पैजा लावणे व जुगार खेळणे यासंबंधीची प्रकरणे हाताळणे.
- सिनेमा (भारतीय चित्रपटांची निर्मिती व वितरण करण्यास उत्तेजन देणे आणि शैक्षणिक, वैज्ञानिक व मनोरंजन चित्रपटांचे प्रदर्शन व वापर या खेरीज) परवाना देणे व नियंत्रण ठेवणे.
- राज्याच्या सुरक्षिततेच्या संबंधातील कारवाईसाठी केलेली प्रतिबंधात्मक स्थानबध्दता, सार्वजनिक व्यवस्था राखणे किंवा समाजाला अत्यावश्यक वस्तू व सेवा यांचा पुरवठा करणे यांच्याशी संबंधित स्थानबध्दतेला अधिन असलेल्या व्यक्तिची प्रकरणे हाताळणे.
- राजद्रोहात्मक बैठका घेण्याच्या कृतीसह राज्याविरोधी केलेले सर्व अपराध आणि १९०८ ची फौजदारी कायद्यातील सुधारणा इत्यादी बाबींची प्रकरणे हाताळणे.
- राजकीय सामाजिक आंदोलने आणि घातपाती कारवाया आणि त्या हाताळण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधक उपाययोजना तसेच विलक्षण घटना, आंतर- सामाजिक संबंध, दंगे, विक्षोभ.
- फौजदारी प्रक्रिया संहितेखालील खटले मागे घेणे/काढून घेणे.
- गुन्हेगार वेडे, सिध्दापराधी व वेडे सिध्द करण्याची प्रक्रिया.
- स्फोटके नियंत्रण, वाहतूक, साठवण, उत्पादन, पेट्रोलीयम अधिनियम १९५४ खालील पेट्रोलीयम व इतर ज्वलनशिल पदार्थाचे परिक्षण व संमिश्रण कार्बाईड व कॅल्शीयम नियम
- पुरलेल्या मयत व्यक्ती उकरून काढणे, हरवलेल्या व्यक्ती, मयत व्यक्तीची संपदा.
- शस्त्रास्त्रे, अग्निशस्त्रे व दारुगोळा.
- कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे दंडाधिकारीय अधिकार देणे काढून घेणे.
- (एक) भारताची अंतर्गत सुरक्षा व संरक्षण (नौदल, भूदल किंवा वायुदल), अंतर्गत सुरक्षेशी संबंधीत असणाऱ्या बाबी (मुलकी अधिकारांचा वापर करताना नौदलाचा, भूदलाचा किंवा वायुदलाचा वापर करण्यासह)
(दोन) साह्यकारी व भारतीय प्रादेशिक सेनादले.
(तीन) भारतीय स्थलसेवेच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या
(चार) सैन्याची सेवाप्रवेश व वाहतूक (पाच)
(पाच) इतर संकोर्ण सैन्यविषयक बाबी, यांसह नौदल, भूदल व वायुदल आणि इतर कोणतीही सशस्त्र दले आणि संधीय केंद्रीय गुप्तवार्ता व अन्वेषण संस्था. - चिन्ह व नावे (अनुचित वापर करण्यास प्रतिबंध) अधिनियम, १९५०
- परराष्ट्रीय व्यवहार, परकीय देशांशी संधी व करार करणे आणि परकीय देशांशी केलेल्या प्रत्यर्पण संधीची, करारांची व अभिसंधीची अमलबजावणी करणे.
- भारतामध्ये प्रवेश देणे आणि भारतातून स्थलांतर करणे व हद्दपार करणे, भारतातील विदेशी
धर्मप्रचारक, भारताबाहेरील ठिकाणाच्या तीर्थयात्रा - नागरिकत्व.
- संरक्षण, मूळ व्यवहार किंवा भारताची सुरक्षा या संबंधातील कारणांसाठी प्रतिबंधात्मक स्थानबध्दता, अशा प्रकारे स्थानबध्द केलेल्या व्यक्ति.
- पारपत्र व प्रवेशपत्र (व्हिसा).
- विदेशी व्यक्तिचे प्रत्यार्पण.
- वय राष्ट्रीयत्व यांची प्रमाणपत्रे.
- नागरी संरक्षण, गृह रक्षक दल, ग्राम संरक्षण पथके तत्संबंधित बाबी.
पोलीस विभाग गृह रक्षक दल
- गृहरक्षक संघटनेच्या वेतनी अधिकाऱ्यांची व जिल्हा समादेशकांची (मानसेवी) नियुक्ती
- वेतनी व मानसेवी कर्मचाऱ्यांच्या अपिलांसह गृहरक्षक दल संघटनेची स्थापना
- मुंबई गृहरक्षक दल अधिनियम 1947 व गृहरक्षक दल नियम 1953 यांच्याशी संबंधित असणाऱ्या बाबी.
- केंद्र शासनाकडून गृहरक्षक दल संघटनेवर केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती
- आणीबाणीच्या काळात गृहरक्षक दल तैनात करणे
नागरी संरक्षण दल
- नागरी संरक्षण दल संघटनेच्या वेतनदेयी अधिकाऱ्याची (मानसेवी) नियुक्ती.
- नागरी संरक्षण दल संघटनेची स्थापना.
- नागरी संरक्षण दल अधिनियम, 1968 शी संबंधित असणाऱ्या बाबी.
- नागरी सरंक्षण दल संघटनेवर केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती.
- आणीबाणीच्या काळात नागरी संरक्षण दल तैनात करणे.
सरकारी अभियोग संचालनालय
- राज्य शासनाच्या वतीने फौजदारी न्यायालयांमध्ये फौजदारी न्यायचौकशी करणे आणि संबंधित कायद्याचे उचित दंडकारी कलमे लावण्याबाबत पोलीसांना व इतर शासकीय विभागांच्या कार्यालयांना कायद्याचा सल्ला देणे
- अपील व पुर्नरीक्षण अर्ज दाखल करणे
- दंडाधिकाऱ्याकडून, सत्र व उच्च न्यायालयांकडून दोषमुक्त केलेल्या प्रकरणांची छाननी करणे आणि अपील करावे किंवा करु नये हे ठरविणे
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा
- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनाविषयक बाबी
- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे आधुनिकिकरण
- जे.जे.शवविच्छेदन केंद्र भायखळा येथील आस्थापना विषयक बाबी
- पोलीस दलाच्या वाहन, यंत्र सामुग्री, साधन सामुग्री, गणवेष इत्यादी विषयक बाबी.
तुरुंग
- जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांची मुदतीपूर्वी मुक्तता करणे
- वैद्यकीय कारणांवरुन कैद्यांची मुदतीपूर्वी मुक्तता करणे
- घटनेच्या अनुच्छेद 161 स्थायी कैद्यांना माफी देण्याबाबत मा.राज्यपाल महोदयांकडे शिफारस करणे
- कैद्यांना माफी देणे
- विशेष प्रसंगी म्हणजेच दि.15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 14 एप्रिल रोजी माफी जाहिर करणे
- पोलीस अन्वेषणासाठी आवश्यक असलेल्या सिध्दापराधीची शिक्षा तात्पुरती निलंबित करणे
- मनोरुग्ण असलेल्या कैद्यांचे हस्तांतरण व मुक्तता
- मुक्त निवासासाठी कैद्यांचे हस्तांतरण करणे
- आवश्यक असेल तेव्हा, विद्यमान नियमांमध्ये फेरबदल करणे
- आवश्यक असेल तेव्हा, तात्पुरते कारागृह घोषित करणे
- अ/ब वर्ग (राजपत्रित) पदांची नियुक्ती करणे
- कैद्यांच्या अभिवचन रजेच्या अपिल अर्जावर निर्णय घेणे
- कारागृहांचे बांधकाम करणे, कारागृहांचे कारागृह उद्योगांचे आधुनिकीकरण करणे
- मुक्त कारागृह, किशोर सुधार शाळा, महिलांकरिता खुले कारागृह सुरु करणे
राज्य उत्पादन शुल्क
या विभागाची / कायद्याची तरतुद राज्यघटनेतील कलम 47 च्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आरओबी-1089/अठरा (ओ. अँड ए.), दिनांक 28 डिसेंबर 1989 पाचवी सुधारित नियमावली, 1989 मध्ये अस्तित्वात आली. त्यानुसार या विभागाचे “दारुबंदी आणि उत्पादन शुल्क” हे नाव बदलून “राज्य उत्पादन शुल्क” असे करण्यात आले आहे.
या विभागाकडून खालील अधिनियमांची अंमलबजावणी करण्यात येते.
- महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949
- मुंबई अफु ओढण्याबाबत अधिनियम, 1936
- मुंबई औषधीद्रव्ये (नियंत्रण) अधिनियम, 1959
- मुंबई मळी (नियंत्रण) अधिनियम, 1956
- दि नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रासिक सबस्टन्सेस अधिनियम, 1985
या विभागाची प्रमुख कामे म्हणजे अधिनियमातील अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी आणि प्राधान्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 व अन्य अधिनियमांनुसार विविध नियंत्रणांची अंमलबजावणी करणे, तसेच पेय मद्यावर आणि मद्यार्क व नारकोटिक्स तथा नार्कोटिक ड्रग्ज युक्त औषधातील कर वसूल करणे ही महत्त्वाची कर्तव्य आहेत. त्या शिवाय महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 प्रमाणे एन. डी. पी. एस. कायदा, 1985 अंतर्गत अमली पदार्थ विषयक गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हे नोंदवून त्यासंबंधीची प्रकरणे न्यायालयात दाखल करणे इत्यादी जबाबदारीही या विभागाकडे सोपविण्यात आलेली आहे.
प्रोत्साहनपर बक्षिस योजना :-
अवैद्य मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीच्या धंद्याची माहिती मिळावी व गुणात्मक गुन्हे उघडकीस यावेत म्हणून खबऱ्यांना व अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषणकामी प्रोत्साहन मिळावे म्हणून नोंदविण्यात येणाऱ्या प्रकरणाच्या गुणवत्तेच्या आधारे बक्षीस देण्याकरता शासन निर्णय क्रमांक बीजीटी-1016 / प्र.क्र.39 / राउशु-1, दिनांक 9 ऑक्टोंबर, 2017 निर्गमित केलेला असून त्याअनुषंगाने बक्षिसे देण्यात येतात.
उत्कृष्ट / गुणवत्तापुर्वक कार्याबद्दल पदके / सन्मानचिन्ह प्रदान करण्याबाबत योजना :
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल जसे- उत्कृष्ठ कर्तृत्व / धाडस / साहस, योग्य तपास महसूलवृद्धीसाठी केलेली महत्वाची कामगिरी इ. बाबी विचारात घेऊन अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना दरवर्षी 26 जानेवारी रोजी खालीलप्रमाणे पदके व सन्मानचिन्ह प्रदान करण्याबाबत शासन निर्णय क्र.एमआयएस 1222 / प्र. क्र. 01 / राउशु-1 / शिकाना दि. 10 जानेवारी, 2023 निर्गमित केलेला आहे.
तक्रारीसाठी ऑनलाइन व्यासपीठ व ऑनलाइन तक्रार निवारण सुविधा :
राज्यातील अवैद्य मद्याबाबतच्या धंद्याची माहिती जनतेतुन प्राप्त व्हावी म्हणून आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. जनतेला तक्रारी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हाट्सअप क्रमांक 8422 001133 उपलब्ध करून देण्यात आला आहे. अवैद्य मद्यनिर्मिती, वाहतूक, बाळगणुक व विक्रीवर कारवाई करण्यासाठी शासकीय यंत्रणेला जनसहभागाची साथ मिळावी म्हणून महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 मध्ये सुधारणा करण्यात येऊन नव्याने कलम 134-अ दाखल करून महाराष्ट्र ग्रामरक्षक दल नियमावली, 2017 तयार करण्यात आलेली आहे.
- मादक द्रव्ये अफूच्या बाबतीत भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचितील सूची एक मधील नोंद क्र.59 च्या तरतुदींस अधीनराहून मद्य, औषधिद्रव्ये (धोकादायक औषधिद्रव्यांसह) व विषारीद्रव्ये यांचे संबंधी बाबी हाताळणे.
- राज्यात निर्माण झालेल्या किंवा उत्पादित केलेल्या पुढील मालावरील राज्य उत्पदान शुल्क आणि भारतात अन्यत्र निर्माण झालेल्या किंवा उत्पादित केलेल्या तत्सम मालावर त्याच दराने किंवा निम्न दराने शुल्क आकारणे
- मानवी सेवनासाठी असलेले अल्कोहोलिक मद्य
- अल्कोहोलचा समावेश असणारी औषधी व प्रसाधन सामग्री
- अफू, भारतीय भांग व इतर गुंगीकारक औषधीद्रव्ये व अंमली पदार्थ
- अफू लागवड व वस्तूनिर्मिती किंवा निर्यात करण्यासाठीची विक्री
- भारतातील राज्यांबरोबर राज्य उत्पादन शुल्क करार
- काकवीचे (मळीचे) नियंत्रण व नियत वाटप
परिवहन
- यंत्रचलित वाहने, मोटार वाहने व सार्वजनिक वाहने मोटार वाहने (शासकीय कोटयातून मोटार कार, स्कूटर्स व यंत्रचलित अन्य वाहने देण्याची संबंधित असणाऱ्या बाबी वगळून)
- मार्ग परिवहन सेवा
- रस्त्यावर वापर करण्यास योग्य असलेल्या वाहनांवरील कर माग ते यंत्रचलित असतील किंवा नसतील
- रस्त्याने वाहून नेलेल्या मालांवरील व उतारुंवरील कर
- मोटार कार (वितरण व विक्री) नियंत्रण आदेश, 1950 स्कूटर्स (वितरण व विक्री) नियंत्रण आदेश, 1960 व ट्रॅक्टर्स (वितरण व विक्री) नियंत्रण आदेश, 1971
- महाराष्ट्र मोटार वाहनांचे अधिग्रहण व नियंत्रण अधिनियम, 1965
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
बंदरे
- रेल्वे व संलग्न बाबी (नवीन रेल्वे प्रकल्प व रेल्वे स्थानकांची नावे यांसह परंतू रेल्वे वरील /खालील पूल वगळून
- भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीतील सूची एक मध्ये विनिर्दिष्ट न केलेली तर उताराची व दळणवळणाची अन्य साधने, अशा रेल्वेच्या बाबतीत सूची एकच्या तरतूदीस अधीन राहून लहान रेल्वे, अशा जल मार्गाच्या संबंधात भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमधील सूची एक व सूची तीनच्या अधीन राहून त्यावरील देशांतर्गत जलमार्ग व वाहतूक
- मोठया बंदरांशी संबंधित असणाऱ्या बाबी
- संसदेने केलेल्या किंवा अस्तित्वात असणाऱ्या कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये मोठी बंदरे म्हणून घोषित केलेल्या बंदराखेरीज इतर बंदरे
- प्रकाश नौका, संकेतदीप आणि नौका व विभागाने यांच्या सुरक्षिततेकरिता अन्य तरतुदी यांसह दिपगृहे
- देशांतर्गत जल मार्गाने वाहतूक केलेल्या उतारुंवरील व मालावरील शुल्क
- यंत्रचलित जलयनासंबंधी देशांतर्गत जलमार्गामधील नौपरिवहन व नौकायन आणि अशा जलमार्गावरील पथनियम व राष्ट्रीय जलमार्गाच्या बाबतीत, भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमधील सूचीच्या तरतुदींस अधीन राहून, देशांतर्गत जल मार्गावरुन उतारूंची व मालाची वाहतूक करणे
- भरती-आहोटीच्या पाण्यावरील नौपरिवहन व नौकायन यांसह नागरी नौपरिवहन व नौकायन व्यापारी नाविकांचे शिक्षण व प्रशिक्षण यांच्या तरतुदी आणि राज्याअंतर्गत जल बाष्प जलयाने अधिनियमाद्वारे तरतूद केलेल्या अशा शिक्षण व प्रशिक्षणाचे नियमन